नमस्कार. काही दिवसानुपूर्वी एक लेख वाचण्यात आला होता ज्यामध्ये कै भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येबद्दल विचार मांडण्यात आले होते. विशेषकरून, आत्मसमर्पण करून जीवन संपविण्याचे समर्थन करण्यात आले होते. त्यातील ठळक मुद्दे खाली मांडतो आहे.
जेव्हा क्षमतेचा अंत होतो तेव्हा अस्तीत्व संपुष्टात आणणेच श्रेयस्कर समजतो
"पण जनमाणसातील श्रेष्ठत्व व घरातील नगण्यस्थान यातील द्वंद्वात भरडून निघाल्यावर लक्तरी जीवन जगण्याचे लाचार बळ त्यांच्यात ऊरले नव्हते,त्यांनी पर्याय निवडला. सदैव विजीगिषु असामान्य लोकोत्तर जगतात ते पराभुत लाचारी अंगिकारु शकत नाहीत. असे पुरुष आत्मसमर्पण करतात"
"वाजपेयी फर्नांडीस अनिर्णायकी अवस्थेत "अरुणा शानभाग"सारखे अस्तित्वात आहेत.निर्णय घेण्याचे अंतीम अधिकार नियंत्याने त्यांना बहाल केलै"
"आज ९५% लोक आपण कशासाठी जगतोय हे ठामपणे सांगुही शकणार नाहीत. असे काय या भुतलावावर तुमचे कार्य राहीलय म्हणुन आपण जगतोय,असा प्रश्न स्वत:ला विचारुन तरी बघा! जगण्यातील निरर्थता त्वरीत समजेल. जन्माला आलोच आहोत तर चला मरेपर्यन्त जगुयात,या सहजवृत्तीने जगणार्यांनी आत्महत्त्या वा आत्मसमर्पण करणार्यांच्या मानसिकतेचा शोध घेण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे मनातसुध्दा आणु नये"
======
एका अध्यात्मिक व्यक्तीने केलेल्या आत्महत्येबद्दल हे विचार अतिशय चुकीच्या दिशेने आहेत. मुळात अध्यात्मिक व्यक्ती आत्महत्या कधीच करणार नाही. आत्मसमर्पण सुद्धा करणार नाही. वरील लेखकाने आत्मसमर्पणाचे ज्ञानेश्वर, श्रीराम, लक्ष्मण वगैरे उदाहरण दिले आहेत. परिस्थितीला वैतागून जीवन संपवणे एक, आणि आपले कार्य संपले म्हणून जीवन संपवणे हे वेगळे. त्यामुळे ह्या तिघांना साने गुरुजी आणि हिटलर ह्यांच्या सोबत एकाच मापात मोजणे चुकीचे आहे. लेखकाने लिहिल्या प्रमाणे भैय्यूजी महाराजांनी घराच्या परिस्थितीला वॆतागून जीवन संपवले असं स्पष्ट लिहिले आहे ह्याची नोंद घ्यावी.
अध्यात्म व logic ह्या दोन्ही दृष्टीने वरील विचार कसे दिशाभूल करणारे आहे ते बघू.
अध्यात्माच्या दृष्टीने -
भोग फक्त मन भोगत, शरीर नाही. त्रास झाला तर मनाला होतो. घराची परिस्थिती नीट नाही हा त्रास मनाला असतो, शरीराला नाही. जीवन संपतं तेव्हा जीव आपल्या सोबत मन व बुद्धी घेऊन जातो. मग, अस्वस्थ मन हे शरीर संपवल्यावर तसेच राहणार असेल तर शरीर संपवल्याने काय साध्य होणार? मनाला शांत करण्यासाठी शरीराची गरज असते (प्राणायाम, ध्यान, ज्ञान वगैरे).
आणि परिस्थिती हाताबाहेर असेल तर आपले भोग स्वीकारावेत व भोगावेत. सगळी परिस्थिती सहन करण्यासाठी अध्यात्म शक्ती देतेच. जीवन म्हटल्यावर चढ ऊतार येणारच. ही पण परिस्थिती बदलेल असा विश्वास ठेवावा.
logically विचार केल्यास -
जीवन संपवण्याचा अधिकार कोणासही नाही (कायदा, युद्ध वगैरे विषय सोडून).
एखाद्या व्यक्तीचे वय झाले आहे, ती कोणाच्या उपयोगाची नाही, म्हणून तिने जीवन संपविणे योग्य नाही. त्या व्यक्तीचा उपयोग इतरांच्या दृष्टीने असू शकतो. तसेच, उपयोग नाही म्हणून जीवन संपायचे असेल तर उपयोगी आहे की नाही हे कोण ठरविणार? त्या न्यायाने आतंकवादी सुद्धा योग्य, मुलीचा उपयोग नाही म्हणून तिला जन्मत: मारणारे योग्य ,म्हाताऱ्या आई-वडिलांना टाकून देणारे किंवा त्यांना मारणारे योग्य, अपंग, मतिमंद मूल जन्माला आल्यावर त्याला मारणारे योग्य.. आणि, असंच चालू ठेवलं तर ह्या सगळ्या लोकांना जगण्याचा अधिकारच नाही??
माणूस आशेवर जगतो. आज आजारी पडला तर उपयोगी नाही म्हणून जीव देत नाही, तर बरं होण्यासाठी उपचार घेतो. तसेच, आजची परिस्थिती खराब आहे म्हणून जीवन संपविण्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्वीकारून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात खरे शौर्य आहे. नाहीतर ज्ञानेश्वरांनी पूर्वीच आत्महत्या केली असती, डॉ. आंबेडकर शिकलेच नसते, महात्मा फुलेंनी आपले कार्य पुढे नेलेच नसते, सावरकरांनी सुद्धा इतर अनेक कैद्यांप्रमाणे जीवन संपवले असते आणि शिवाजी महाराजांनी मोगलांची लाचारी पत्करली असती.
थोडा संयम हवा, थोडी श्रद्धा हवी. जीवन जगावे/जगवावे , संपवू नये.
यतीन विष्णु जोशी

No comments:
Post a Comment